शिक्षक संघटनेला यश : गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकारातून शिक्षकांचे 61 लाख मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपरिषद शिक्षण मंडळाकडून शिक्षकांची 10% प्रमाणे 60 लाख 81 हजार 810 रुपयांची पगाराची रक्कम येणे बाकी होती. या संदर्भात महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगर पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी थकीत रक्कम न मिळाल्यास नगरपरिषदे समोर 17 पासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता, आज या प्रश्नी तातडीचे बैठक होऊन दोन दिवसात थकीत रक्कम देण्यात असल्याची माहिती अर्जुन कोळी यांनी दिली.

या संदर्भात सत्तारूढ गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी संघटना पदाधिकारी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैकठीत थकीत 61 लाख रुपये दोन दिवसात देण्याचे मान्य केले. या बाबत नगरसंचालक कार्यालकडून आजच अनुदान प्राप्त झाले असून, सर्व थकीत रक्कम दोन दिवसात अदा करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील यांनी यासाठी सहकार्य केले. बैठकीस आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, एल. बी.गवळी, अरविंद पाटील, अविनाश भोसले, संग्राम गाढवे, विक्रम सपकाळ, सचिन माने, अरुण महामुनी, धोंडिराम चपडे व नामदेव कुरमुडे उपस्थित होते.

Leave a Comment