हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी महत्त्वपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा इस्रोने करून दाखवली आहे. आज एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग झाले आहे. त्यामुळे 2024 वर्षाची सुरुवात सर्वच भारतीयांसाठी खूपच धमाकेदार झाली आहे. या नवीन वर्षात इस्रोने आपली पहिली मोहीम यशस्वी केल्याने आज इस्रो टीमचे देशभरात कौतुक केले जात आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने XPoSat उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. यानंतर ठीक 22 मिनिटांमध्ये XPoSat उपग्रहाला त्यांच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह अंतराळातील कृष्णविवरे आणि इतर प्रमुख प्रकाश स्त्रोतांचा अभ्यास आणि संशोधन करणार आहे.
उपग्रहाचे कार्य काय?
तसेच, XPoSat उपग्रह पृथ्वीपासून 650 किलोमीटर उंचीवरील कक्षेत 6 डिग्री अँगलमध्ये प्रस्थापित करण्यात आला आहे. आता या उपग्रहाची रॉकेटची कक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही वेळ ही मोहीम सुरू राहील. या नव्या मोहिमेच्या माध्यमातूनच भारत पुन्हा आणखीन एक नवा इतिहास असणार आहे. खरे तर, कृष्णविवरे, न्यूट्रॉन-स्टार आणि अंतराळात असणाऱ्या अनेक
प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होईल.
दरम्यान, XPoSat हे उपग्रह बनवण्यासाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यापूर्वी 2021 मध्ये NASA ने मिशन IXPE लाँच केले होते. त्यावेळी 188 मिलियन डॉलरचा खर्च झाला होता. त्यानंतर आज एक्सपोसॅट या उपग्रहाचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. हा ग्रह ब्लॅक होल आणि न्यूट्रॉनचा अभ्यास करेल.