कराड | सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे यकृत प्रत्यारोपण सुविधा सुरू झाली असून नुकतेच एका 54 वर्षीय रूग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तालुका पातळीवर उपलब्ध झालेल्या यकृत प्रत्यारोपण सेवेमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व आसपासच्या रूग्णांना मोठ्या शहरांत जाण्याची गरज नाही. संपूर्ण देशभरात तालुका पातळीवर यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच अशी सुविधा आहे. यामुळे सह्याद्री हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सह्याद्रि हॉस्पिटल्सचे उपाध्यक्ष डॉ. केतन आपटे, सह्याद्री हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण, सह्याद्रि सुपर स्पेशालिटीचे संचालक अमित चव्हाण, यकृत व मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. बिपीन विभूते, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे मुख्य व्यवस्थापक डॉ. व्यंकटेश मुळे, सह्याद्रि हॉस्पिटल्स समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चारूदत्त आपटे आदी मान्यवर उपस्थित होते
सह्याद्री हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण म्हणाले, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड आता एक अधिकृत अवयव प्रत्यारोपण केंद्र आहे आहे जिथे यकृत, स्वादुपिंड , मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. याशिवाय हे एक अधिकृत अवयव पुनरप्राप्ती केंद्र आहे. जिथे दान केलेली अवयव काढून प्रत्यारोपण केंद्रांना पाठवले जाऊ शकतात.
कोल्हापूर ते कराड 25 मिनिटांत अंतर पार
रस्ते अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या व कोल्हापूर येथील एका रूग्णालयात मेंदूमृत घोषित केलेल्या एका 52 वर्षीय महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाची परवानगी दिली. त्यानंतर 14 ऑक्टोबरला सकाळी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून केवळ 25 मिनिटांत कोल्हापूर ते कराड अंतर पार करत हे यकृत सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे आणण्यात आले. त्यानंतर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण करायला 4 तास लागले.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील पहिल्या यकृत प्रत्यारोपण टीममध्ये सह्याद्रि हॉस्पिटलचे हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद तसेच यकृत व मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. बिपिन विभूते,शल्यविशारद डॉ. अपूर्व देशपांडे, प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनिष पाठक, डॉ. मनोज राऊत, डॉ. आदित्य खोत , क्लिनिकल असोसिएट डॉ. अभिजित माने, गॅस्ट्रोएनटेरोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील, फिजिशियन डॉ. संदीप बानूगडे, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. पुष्कर डिकले, राहुल तांबे, अरुण अशोकन, अमन बेले यांचा समावेश होता.
सह्याद्रीत 30 नोव्हेंबरपर्यंत मोफत तपासणी : विश्वजित डुबल
जर आपल्याला पुढील लक्षणे जाणवत असतील, कावीळ, फॅटी लिव्हर , हिपॅटायटिस बी आणि सी, मद्यपानामुळे उध्दभवलेले लिव्हरचे आजार, लिव्हर सिरॉयसिस (लिव्हरचे दीर्घ आजार) , अक्यूट लिव्हर फेल्यूअर , लिव्हर ट्युमर/ कर्करोग, तर लिव्हर तज्ञांना भेटणे गरजेचे असून, दर शुक्रवारी सकाळी 10 ते 112 या वेळेमध्ये सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे लिव्हर ओपीडीची सुविधा उपलब्ध आहे व दि. 30 नोव्हेंबर पर्यंत मोफत तपासणी देखील होणार आहे अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे मॅनेजर विश्वजित डुबल यांनी दिली.