Monday, January 30, 2023

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेली कसोटी जुलै -2022 मध्ये खेळवली जाणार

- Advertisement -

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेल्या मालिकेतील 5 वा कसोटी सामना पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे मालिकेचा हा सामना आता मँचेस्टरऐवजी एजबॅस्टनमध्ये खेळला जाईल. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील कराराअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे लक्षात घ्या कि, भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघाच्या सपोर्ट स्टाफचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा सामना ऐन वेळी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून अनेक माजी इंग्लिश खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. हा सामना रद्द करण्यामागे IPL असल्याचे त्यावेळी या खेळाडूंकडून सांगण्यात आले होते.