सातारा जिल्हा राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी खंडाळा येथील सुदाम जाधव यांची नियुक्ती

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड.

खंडाळा येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुदाम बाळासाहेब जाधव यांची सातारा जिल्हा राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.या निवडी बद्दल सुदाम जाधव यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. या सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.अशोकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड होत असताना या निवडीबद्दल सुदाम जाधव यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.

भटक्या विमुक्तांसाठी कार्य करीत असताना सुदाम जाधव यांनी विविध समस्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे.भटक्या विमुक्त समाजातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अलौकिक कार्याची दखल घेत सातारा जिल्हा राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदासाठी निवड केली असल्याचे नियुक्ती पत्रातून सांगण्यात आलेले आहे.

आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा व कार्याचा अधिक विस्तार करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणार असल्याचे सुदाम जाधव यांनी म्हटलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like