ललितपुर | भारतीय न्यायव्यवस्थेचे एक ब्रीदवाक्य आहे. यामध्ये नेहमी म्हटले जाते की, शंभर गुन्हेगारा सुटले तरी चालतील. पण एक निर्दोशाला शिक्षा होता कामा नये. पण बऱ्याच वेळा अनेक निर्दोष लोकांवर आयुष्यभर शिक्षा भोगण्याची वेळ येते. अशीच घटना ललितपुर येथे घडली आहे. यामध्ये न केलेल्या गुन्ह्यासाठी तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर उच्च न्यायालयाने विष्णू तिवारी नामक व्यक्तीला निर्दोष मुक्त केले आहे. पण या दरम्यान कुटुंबातील अनेक सदस्य मृत्यू पावले असताना त्यांच्या अंत्यदर्शनालाही ते ‘पॅरोल’ न मिळाल्यामुळे जाऊ शकले नाहीत.
विष्णू तिवारी यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी तीन वर्ष ललितपुर करावासामध्ये आणि 17 वर्ष केंद्रीय कारावासामध्ये शिक्षेमध्ये काढले. यानंतर आत्ता अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे गुन्हा केलाच नसताना तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगावी लागल्याच्या घटनेची चर्चा होत आहे.
गावातील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आणि एससी व एसटी ॲट्रॉसिटी ॲक्ट मधून गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांची रवानगी करावासामध्ये केली गेली होती. यादरम्यान विष्णू यांचे वडील आणि दोन भाऊ मृत्युमुखी पडले पण त्यांच्या अंत्यविधीसाठी ‘पॅरोल’ न मिळाल्यामुळे विष्णू येऊ शकले नाहीत. यामुळे त्यांना फार दुःख झाले होते. न केलेल्या गुन्ह्यामुळे गुन्ह्याची तब्बल वीस वर्ष शिक्षा भोगून शेवटी दुःखच वाट्यालामुळे समाजामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’