हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मूळव्याध हा सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर कोंब येऊन वेदना जाणवतात. मसालेदार पदार्थ, जंक फूड, तेलकट पदार्थ यामुळे मुळव्याधाची समस्या वाढू शकते. आज आपण जाणून घेऊया मुळव्याधाची लक्षणे आणि त्यावरील उपाय ..
मुळव्याधाची लक्षणे-
१) गुंदांच्या शिरांना सूज येण किंवा त्याठिकाणी कोंब येणे
२) शौचानंतर रक्तस्त्राव होणं
३) गुदाच्या ठिकाणी जळजळ, खाज येणे, भयंकर वेदना होणं
४) शौचालायावेळी खूप मोठ्या प्रमाणात वेदना होणं
मुळव्याध होण्याची कारणे-
१) अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा
२) दीर्घकालीन जुलाब
३) सतत खोकला किंवा वारंवार उलट्या
४) बैठी जीवनशैली
५) अनुवंशिकता
मुळव्याधावर उपाय –
मुळव्याधाचा त्रास असलेल्या लोकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्यावा. पाणी हे फक्त शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर बद्धकोष्ठतेवर देखील उपचार करते. मूळव्याधचे रुग्ण रस, नारळपाणी घेऊ शकतात.
मूळव्याधाच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी सफरचंद, द्राक्षे, जांभळं ह्यासारखी फळं खाणं खूप उपयुक्त ठरेल. या सर्व फळांमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात.
मूळव्याध असलेल्या रुग्णांनी नियमित व्यायाम करावा . मूळव्याध बद्धकोष्ठतेमुळे होतो आणि बद्धकोष्ठता हा खराब आहार आणि कमी शारीरिक हालचालीमुळे होतो. त्यामुळे या दोन्ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे, धावणे आणि इतर शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.
मूळव्याध असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात गहू, ज्वारी, कडधान्ये यांचा समावेश करावा.
हिरव्या पालेभाज्याने सेवन करावं. कोबी, टोमॅटो, गाजर, मुळा यामध्ये ह्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधीचा त्रास वाढत नाही.