Sugarcane FRP Hike : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी सरकारची मोठी घोषणा; FRP 8% नी वाढवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sugarcane FRP Hike : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोदी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने ऊसाचा FRP 8% नी वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटल आहे.आता ती आता 340 रुपये होईल.CCEA बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सुधारित किमती 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांचे हित बघितलं आहे. प्रत्येक वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली. आजही मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 साठी 10.25% साखर रिकव्हरी दराने उसाच्या वाजवी आणि प्रति क्विंटल किंमतीला (FRP) 340 रुपये मंजूर केले. 2024-25 साठी घोषित FRP चालू हंगाम 2023-24 च्या उसाच्या FRP पेक्षा सुमारे 8% जास्त (Sugarcane FRP Hike) आहे. या सुधारित किमती 1 ऑक्टोबरपासून लागू होतील आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.

5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा – Sugarcane FRP Hike

दरम्यान, या निर्णयानंतर सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हंटल आहे कि या निवेदनात म्हटले आहे की भारत आधीच उसासाठी जगातील सर्वात जास्त किंमत देत आहे आणि तरीही सरकार घरगुती ग्राहकांना जगातील सर्वात स्वस्त साखर पुरवठा सुनिश्चित करत आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 5 कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी (कुटुंबातील सदस्यांसह) आणि साखर क्षेत्राशी संबंधित लाखो व्यक्तींना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदींच्या हमीभावाच्या पूर्ततेची पुष्टी होते.