सुहास दाशरथेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी पक्षाला एक धक्का बसला आहे. 14 डिसेंबर 2019 रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेल्या श्वास दशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. यामुळे ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

अडीच महिन्यात पक्षप्रमुखांनी एकदाही संपर्क साधला नाही. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील विचारात घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दशरथे यांनी हा निर्णय घेतला. जानेवारी 2020 मध्ये दशरथे यांनी शिवसेनेसोबत असलेली 30 वर्षांची नाळ तोडून मनसेचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या पक्षात दोन गट पडले. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर विरुद्ध आहे असा शितसंघर्ष सुरू झाला.

शिवसेने विरुद्ध दाष्रथ त्यांनी आंदोलने केली. ही पक्षाची संस्कृती नाही. असा ठपका दशरथे यांच्यावर ठेवला गेला.

Leave a Comment