हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर गृहविभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई याना फोन करून शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे आदेश दिले असा मोठा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
सुहास कांदे म्हणाले, एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, त्यानुसार त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार सुरु होता. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याना फोन करून एकनाथ शिंदे याना सुरक्षा देऊ नका असं सांगितले असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला. एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली असा सवाल कांदे यांनी केला.
कारकून, शिक्षिका ते देशाची सर्वोच्च नागरिक; द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय प्रवास पहाच
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/z55WuclitJ@HelloMaharashtr
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 22, 2022
दरम्यान, आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत. तसेच माझं नेमकं काय चुकलं? या आशयाखाली निवेदन देणार आहे. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा असा सवालही त्यांनी केला. जर आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नाची उत्तरे दिली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला उभं राहील असं आव्हानही सुहास कांदे यांनी दिले.