प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आत्महत्या ही कमजोर मनाच्या लोकांसोबत खमक्या लोकांनाही पोखरु लागल्याचं पहायला मिळत आहे. आत्महत्या करण्यासाठी कोणतंही ठोस कारण नसलं तरी लोक त्याच्या आहारी जाऊ लागले आहेत. अशीच एक घटना सातारा शहरात घडली असून लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्‍याने सातारा शहर पोलीस ठाण्यातच बाटलीतील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी रात्री घडली.

प्रेम प्रकरणातून एका पोलीस कर्मचार्‍याला चौकशीसाठी अधिकार्‍यांनी बोलावले होते. यावेळी तू-तू मैं मैं झाल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याने अचानक खिशातील बाटलीमधील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्याच्या हातातील बाटली उडवली. त्यामुळे पोलीस ठाण्यातच विषारी औषधाची बाटली सांडली गेली. सर्वत्र उग्र वास पसरला होता. त्यानंतर कर्मचार्‍यांनी फरशी स्वच्छ केली.  हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. आता या प्रकरणानंतर पोलिसच हे प्रकरण कसं हाताळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.