साताऱ्यात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या, घटनास्थळी कोविड मनोरूग्ण असा मजकूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा शहरातील विसावा नाक्यावरून जवळच असणाऱ्या आण्णाासाहेब कल्याणी शाळेजवळ एका अज्ञात तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील अज्ञात तरूण हा कोरोना बाधित असल्याचा संशय प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे.

साताऱ्यातील आण्णासाहेब कल्याणी येथे तरूणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरूणाच्या शेजारी कोविड मनोरूग्ण असे लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी तरूणांची बाॅडी उतरलेली नाही. त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असून रूग्णवाहिकेला बोलवले आहे.

आण्णासाहेब कल्याणी शाळेजवळील बागेलगत असलेल्या ओढ्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांना तरूणांची अद्याप कोणतीही माहीती नाही. पोलिस त्या परिसरात लोकांच्याकडून माहीती घेत असून सध्या अज्ञात म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.