सासूने मारहाण केली म्हणून जावायाची गळफास घेऊन आत्महत्या

sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मुलीला माहेरी का पाठवत नाही असे म्हणत सासूने जावयाला त्याच्या ऑफिसमध्ये जावून मारहाण केली. ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना समोर झालेली मारहाणीचा अपमान सहन न करू शकल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. संजय भागाजी कांबळे (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गारखेड परिसरातील भारतनगरात राहत होता.

कैलास कांबळे हा कामगार चौकातील रिलायबल कटन टेस्टिंग येथे कामाला होता. २३ जुलै रोजी सकाळी संजय त्याच्या ऑफिस मध्ये काम करत असताना तेथे त्याची सासू मंगल आव्हाड हिने मुलीला माहेरी का पाठवत नाही म्हणून संजयशी वाद घातला, आणि त्याला मारहाण ही केली. संजयने सगळी घडलेली घटना त्याच्या आई व पत्नी मनीषाला सांगितले. त्यावरून मनिषाने संजयशी वाद घातला, झालेल्या प्रकारातून संजयने रात्री साडेअकराच्या सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

या घटनेनंतर शनिवारी सकाळी संजयच्या नातेवाईकांनी घाटीत गोंधळ घातला आणि म्हंटले की जो पर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीसांनी मनीषा व तिची आई मंगल आव्हाड यांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत.