अहमदनगर प्रतिनिधी । नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई ने मुलीला सोबत घेऊन आत्महत्या का केली ? यामागचे कारणं अद्याप समजू शकले नाही . नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27) रा. धनगरवाडी तालुका नगर, व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला .
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.२८) रात्री नीता कापडे आणि मुलगी प्रणाली यांनी स्वतःच्या घराला कडी लावून घराबाहेर पडल्या. सकाळी घरच्यांना त्या बराच वेळ दिसून आल्या नाहीत , म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली असता, जवळच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका विहिरी मध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शविच्छेदन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास दीपक गांगर्डे हे करत आहेत. माय-लेकी ने आत्महत्या का केली ? याचे अद्यापही कारण समजले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.