सातारा | सातारा येथे शहरात असलेल्या बालसुधारगृहामध्ये एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची शनिवारी सकाळी घटना उघडकीस आलेली आहे. अल्पवयीन मुलगा हा वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेला होता. अल्पवयीन संशयित म्हणून गेली काही दिवस त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्याने बाथरूममध्ये आत्महत्या केली आहे.
मुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच मृताच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर गर्दी केली होती. याठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी दाखल झालेले होते.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/521145069170715
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसापूर्वी खटाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती.