कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात लावला गळफास

Jitendra Shinde Suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला.

कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी होता. तो पुण्यातील येरवडा कारागृहात तो आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने अचानकपणे गळफास घेऊन आत्महत्या केली. खरं तर कारागृहात कैद्याने आत्महत्या करणे ही गंभीर बाब आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. सदर आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.

काय आहे कोपर्डी प्रकरण

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर येथील कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात आली होती.