दंगल पेटवणारे उच्चवर्गीय ब्राह्मण असतात; आंबेडकरांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता

0
92
sujat ambedkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं वादग्रस्त वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ती बहूजन वर्ग असतो.

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्या वरील वक्तव्याचाही समाचार घेतला. माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा. जर तुम्ही स्वत:च्या मुलाला उतरवणार नसाल तर मग दुसऱ्यांच्याही उतरवू नका,” असं सुजात आंबेडकर यांनी म्हंटल .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here