राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेने सूचक ट्विटद्वारे दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून कोणाकोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या लागलेल्या आहेत. बहुचर्चित असलेल्या सभेला मनेसेने उत्तरसभा असे संबोधले असल्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेने सूचक असे ट्विट केले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक असे ट्वीट केले असून त्यातून त्यांनी “राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती, त्यांच्या साठी खास आजची उत्तरसभा.” असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे या सभेच्या पार्श्वभूमीवर मनेसेकडून व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलेला आहे. ”करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा” असा मथळा देत संदीप देशपांडे यांनी या अगोदर एक व्हिडिओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.