अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
अहमदनगर जिल्ह्यात सध्या चर्चेचे विषय ठरलेले राज्याचे विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अद्यापही भाजपा प्रवेशावर चुप्पी साधली असून उद्या बारा वाजेपर्यंत वाट पहा असं सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. सुजय विखे भाजप मध्ये प्रवेश करणार काय यावर राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर सुजय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रवेशाबाबत विचारले असता “माझा निर्णय झाला असून उद्या बारा वाजेपर्यंत वाट पहा” असं सुचक वक्तव्य त्यानी
सुजय विखे भाजप मध्ये प्रवेश करणार काय यावर राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर सुजय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रवेशाबाबत विचारले असता “माझा निर्णय झाला असून उद्या बारा वाजेपर्यंत वाट पहा” असं सुचक वक्तव्य त्यानी केले.
माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांचा माझ्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासाही विखे यांनी यावेळी केला आहे. आता सुजय विखे भाजपात जाणार की राष्ट्रवादीकडूब त्यांना उमेदवारी मिळाणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.