आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांसमवेत सुजय विखेंनी साजरा केला गुढी पाडवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी / शेतकऱ्यांवर कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट येतातच यामुळे शेतकरी खचून जातोय. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी शिवाजी आमले यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.

भाळवणी येथील आमले कुटुंबीयांच्या घरी आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जाऊन गुढीपाडवा साजरा केला. जणू आपल्या घरी देवता अवतरला अशी भावना आमले कुटुंबीयांची झाली होत. जेव्हा शिवाजी आमले यांनी आत्महत्या केली होती तेव्हा या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होत. मात्र जनसेवा फाउंडेशन च्या मुळे पुन्हा एकदा नवी उभारी घेऊन हे कुटुंब उभा राहिला आहे. आजचा गुढीपाडवा त्यांच्यासाठी अत्यंत गोडवाही घेऊन आला होता.

जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून विखे पाटील परिवाराने हे कुटुंब दत्तक घेतले आहे. गुढी पाडव्याच्या सणाचे औचित्य साधून डाॅ.सुजय विखे पाटील यांनी या परिवाराची भेट घेतली. तसेच आमले कुटुंबीयांच्या घरी घरी गुढी उभारून शुभेच्छा दिल्या.

इतर महत्वाचे –

सातारच्या पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, देशात १०८ वा क्रमांक

महाराष्ट्राची सृष्टी देशमुख यूपीएससी परीक्षेत देशात पहिली

जिल्ह्याचा विकास पाहून सुनील मेंढे यांना निवडून द्या – चंद्रशेखर बावनकुळे 

Leave a Comment