हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आजकाल लोकांमध्ये आपल्या भविष्यासाठीची जागरूकता वाढली आहे. त्यासाठी ते अनेक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. बहुतेक लोकांकडून यासाठी लहान बचत योजनांची निवड केली जाते. जर आपल्यालाही गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी खूप उपयोगी ठरेल. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून गुरुवारी लहान बचत योजनांच्या तिसर्या तिमाहीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.3 टक्के वाढ करण्यात आली आहे.
अशा योजनांपैकीच एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आहे. जर आपण त्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर सरकारकडून त्यामध्ये करण्यात आलेले बदल जाणून घेणे महत्वाचे ठरेल. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे. मात्र, सरकारकडून या योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. SSY मध्ये सध्या 7.6 टक्के वार्षिक व्याज दिला जातो आहे.
खाते कसे उघडायचे ???
Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत कोणतेही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक बँकेच्या अधिकृत शाखेत खाते उघडता येते. यामध्ये वयाच्या 21व्या वर्षी मुलींना या खात्यातून पैसे काढता येतील.
किती गुंतवणूक करता येईल ???
Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत चालू आर्थिक वर्षात वार्षिकरीत्या कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील.
टॅक्स सूट
हे जाणून घ्या कि, Sukanya Samriddhi Yojana मध्ये 80C अंतर्गत आत्तापर्यंत कर सवलतीचा लाभ हा फक्त दोन मुलींच्या खात्यावरच दिला जात होता. तिसऱ्या मुलींसाठी टॅक्समध्ये सूट देण्यात आलेली नव्हती. मात्र, आता या नियमात बदल करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89
हे पण वाचा :
RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या
Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत
RBI कडून रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ, आता कर्जे आणखी महागणार
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर
Bank FD : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकांच्या FD होणार बंद, त्याविषयी जाणून घ्या