हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वजण आपल्या आरोग्याबाबत नेहमीच चिंतेत असतात. अमुक खाल्याने चांगले होईल की तमुक खाल्याने दुष्परीणाम होईल. असे अनेक प्रश्न प्रत्येकाला नेहमी सतावत असतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे एका गृहिणीसाठी तारेवरची कसरत असते. त्यामुळे चांगले खाद्यतेल वापरून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अनेकजण सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या तेलाचा (Sunflower Oil) वापर करतात. पण तुम्ही जे सूर्यफूलाचे तेल वापरता ते तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का??
काय सांगतात तज्ज्ञ?
अनेकांना तळलेले पदार्थ फार आवडतात. त्यामुळे त्यांच्या जेवणात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो आणि परिणामी अनेक व्याधी मागे लागतात. आपल्याकडे अनेकजण सूर्यफुलाचे तेल वापरतात. त्यामुळे सूर्यफूलाचे तेल आरोग्यासाठी किती चांगले आहे. हा प्रश्न पडतोच. याबाबत तज्ञ सांगतात की सूर्यफूलात ओलिक ऍसिडचे जास्त प्रमाणात असते. ज्याचा आरोग्यासाठी फायदा होतो. मात्र या तेलाचा वापर तळण तळण्यासाठी केला तर त्याचा दुष्परीणाम भोगावा लागेल. कारण तळण तळणीसाठी जास्त प्रमाणात तेल गरम करावे लागते. ज्यामुळे हे खाद्य तेल स्थिर राहत नाही. त्यामुळे हे तेल हानिकारक रसायने ऑक्सिडाइझ करते आणि रिलीज करते. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.
तळण्यासाठी सूर्यफूल तेल आहे घातक
तेलकट पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी तर घातक असतेच. मात्र तुम्ही तेलकट पदार्थ करण्यासाठी जे खाद्य तेल वापरता ते देखील आरोग्यासाठी घातक असते. यासाठी जर तुम्ही सूर्यफूल तेल, पाम तेल, रेपसीड तेल आणि सोयाबीन तेल तळणीसाठी वापरत असाल तर ते योग्य नाही. कारण एका स्टडीनुसार असे लक्षात आले की, सूर्यफूल तेल इतर तेलांपेक्षा जास्त प्रमाणात अल्डीहाइड सोडते. जे कर्करोग, हृदयविकार, लठ्ठपणा आणि अल्झायमर यासह अनेक रोगांशी अल्डीहाइड्सचा संबंध आहे. त्यामुळे हे तेल तळणीसाठी वापरणे योग्य नाही.
कोणते तेल आहे योग्य?
सुरफूल, सोयाबीन यासारखे खाद्य तेल तळणीसाठी चांगले नसेल तर मग कोणते तेल चांगले आहे. असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्यासाठी तज्ज्ञ सांगतात की ज्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट हा 177 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. अश्या तेलाचा वापर तुम्ही तळण्यासाठी करू शकता. तसेच तुपाचा वापर हा तळणीसाठी तुम्ही करू शकता. कारण ते उच्च तापमाणात स्थिर राहते. त्याचप्रमाणे खोबरेल तेलही तळणीसाठी फायदेशीर असते. हे तेलदेखील उच्च तापमाणात स्थिर राहते. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होईल.