मुंबई । हिंदी चित्रपटसृष्टीची महान अभिनेत्री नर्गिस दत्तने (Nargis) तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक जबदस्त चित्रपट दिले आहेत. वयाच्या 5 व्या वर्षी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणार्या नर्गिसने श्री 420, मदर इंडिया, चोरी-चोरी, आवारा, आह आणि अनहोनी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1957 मध्ये आलेल्या मदर इंडियानंतर तिने सुनील दत्तशी लग्न केले. 3 मे 1981 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी नर्गिसला कर्करोग झाल्याचे निदान झाले, त्यानंतर तिचे निधन झाले. नरगिस दत्त यांची आज 40 वी पुण्यतिथी आहे. या अभिनेत्रीच्या पुण्यतिथीनिमित्त सुनील दत्तसोबतचे नाते आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेउयात.
सुनील दत्त बरोबरील इंटरव्यू
बॉलिवूडमध्ये नर्गिसची एन्ट्री खूप आधी झाली होती. पण सुनील दत्त त्या काळात ऑल इंडिया रेडिओसाठी काम करायचा. तो रेडिओ जॉकी होता. त्यावेळी नर्गिस एक सुप्रसिद्ध व्यक्ती बनली होती आणि सुनील दत्तला ती आवडतही असे. सुनील दत्तला नरगिसची मुलाखत घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण नर्गिस दत्त साहेबांसमोर येताच दत्त साहेब खूप घाबरून गेले. इंटरव्यू तर लांबच पण तो नरगिसशीही नीट बोलूही शकला नाही. त्याला इंटरव्यू काही घेता आलाच नाही पण सुनील दत्तची नोकरी मात्र धोक्यात आली होती.
राज कपूर आणि नर्गिसची कहाणी
1949 मध्ये मेहबूब खानचा अंदाज चित्रपट यशस्वी होणे नर्गिस, राज कपूर आणि दिलीप कुमार या तिघांसाठी खूप महत्वाचे होते. अंदाज नंतर राज कपूर आणि नर्गिसचा बरसात हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांच्या यशाने राज कपूर आणि नर्गिस यांचे नशिब उजळले. दोघांनी मिळून सुमारे 16 चित्रपट केले. या दोघांच्या केमिस्ट्रीची जितकी रेलवर चर्चा होती तितकीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातही पूर्वीपेक्षा जास्त चर्चा चालली होती.
जेव्हा राज कपूरच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली तेव्हा तेथे प्रचंड गोंधळ उडाला होता. आपल्या कुटुंबाचे विखुरलेले हाल पाहून राज कपूर हळूहळू नरगिसपासून दूर जाऊ लागला. राज कपूरच्या अशा वागण्यामुळे नर्गिस खूप अस्वस्थ होऊ लागली. किश्वर देसाई यांच्या डार्लिंग जी या पुस्तकानुसार नरगिसने बर्याचदा आत्महत्या करण्याचा विचारही केला होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा