हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.परंतु आश्चर्य म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड न केल्याचे सांगितले जात आहे. रोहित शर्माच्या दुखापतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे बीसीसीआयने ट्विटद्वारे कळवले आहे.
यानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटवरुन रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत असल्याचे फोटो शेअर करण्यात आले. या फोटोनंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं. जर रोहित नेट्समध्ये सराव करतोय, तर त्याला अशी कोणती दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, अशा चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान लिटिल मास्टर सुनील गावसकर रोहितची निवड न केल्याने संतापले आहेत. तसेच रोहितची निवड न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
काय म्हणाले गावस्कर –
“रोहित चांगल्या प्रकारे नेट्समध्ये सराव करतोय. रोहितला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असती, तर तो नेट्समध्ये सराव करताना दिसला नसता. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का केली नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. रोहितला नक्की काय झालंय, कोणत्या प्रकारची दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर निवड समितीने समर्थकांना द्यायला हवीत”, असं गावसकर म्हणाले.
Just what we love to see! Hitman in action at today’s training 😍#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
मुंबई इंडियन्सने शेअर केलेले फोटो पाहून मी हैराण झालो. जर रोहित नेट्समध्ये खेळतोय, तर रोहितला अशी कोणती दुखापत झाली, हे मला समजत नाहीये. ऑस्ट्रेलियावर मानसिकरित्या दबाव आणण्यासाठी हे फोटो शेअर केले असावेत. रोहितला काय झालंय हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क क्रिकेट चाहत्यांना आहे”, असंही गावसकर म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’