हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागणाऱ्या भारतीय संघाचा पुढील महत्त्वपुर्ण सामना न्युझीलंडविरोधात आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्याचा सल्ला माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी दिला आहे. फॉर्मात असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील करून घेण्याबाबतचा सल्ला गावसकरांनी दिला आहे.
जर हार्दिक पंड्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी संघ शार्दुल ठाकूरलाही संधी देऊ शकतो.
ईशान किशन दमदार फॉर्मात-
डावखुरा फलंदाज ईशान किशन सध्या दमदार फार्मात आहे. आयपीएल मध्ये मुंबई इंडिअन्स कडून खेळताना इशानने आक्रमक फलंदाजी करत आपलं लक्ष वेधले आहे. तसेच वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात देखील त्याने इंग्लंड विरुद्ध 46 चेंडूत 70 धावांची खेळी केली होती. तर शार्दूल ठाकूर ने चेन्नई कडून खेळताना 8 सामन्यात 15 बळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.