गावसकरांच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वोत्तम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेटला आत्तापर्यंत खूप महान क्रिकेटपटू मिळाले. 80-90 वर्षांच्या या इतिहासात वेळोवेळी भारतीय क्रिकेटला चांगले खेळाडू मिळाले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी,झहीर खान वीरेंद्र सेहवाग, अशी भरपूर नावे भारतीय क्रिकेट मध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली आहेत.त्यामुळे आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू कोण याबद्दलही अनेक चर्चा कायम रंगतात. त्यातच आता लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी त्यांचा आवडता सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू निवडला आहे.

“आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. भारतीय क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. माझ्या मते सर्व खेळाडूंपेक्षांमध्ये तो सरस आहे. सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत तो कायम पहिल्या क्रमांकावरच असेल”, असे गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

“तो असा खेळाडू आहे जो तुम्हाला बॅटने सामना जिंकवून देऊ शकतो आणि गरज पडल्यास गोलंदाजीनेही विजय मिळवून देऊ शकतो. तो प्रतिस्पर्धी संघाचे बळी सहज बाद करू शकतो आणि विजयश्री खेचून आणू शकतो. तसेच तो दणकेबाज शतकही ठोकू शकतो आणि झटपट ८०-९० धावाही करू शकतो. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. त्याने टिपलेले झेलदेखील अप्रतिम होते. तो एक परिपूर्ण खेळाडू होता, म्हणूनच तो माझ्यासाठी सर्वोत्तम खेळाडू आहे”, असे गावसकर यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’