हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी नुकतेच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे. मात्र, श्याम मानव यांना आता अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले आहे. तुमचाही नरेंद्र दाभोलकर करू, अशी धमकी मानव यांना देण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून श्याम मानव हे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान दिल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर श्याम मानव यांना व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीने तुमचाही दाभोलकर करू, अशी धमकी दिली आहे.
अत्यंत अश्लील भाषेत मानव यांना व्हॉटसअपवर धमकी देण्यात आली असून या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. तातडीने मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरील आरोपानंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.