कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल पराभव झाला आहे. तर श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेलने सरपंच 8 जागांवर विजय विजय मिळवला आहे. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित येत हे सत्तांतर घडविले आहे. कराड बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या गटाच्या पराभव याठिकाणी झाला आहे. लोकनियुक्त सरपंच पदी विश्रांती व्यंकटराव पाटील यांनी विजय मिळविला आहे.
विजयी पॅनेल श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेलमधील उमेदवार पुढीलप्रमाणे ः- अंबाबाई वार्ड क्रमांक- 2- अमृत शामराव पाटील, अनिता अजित पाटील. हनुमान वार्ड क्रमांक- 3- दादासो रामचंद्र पाटील, प्रतिभा हिंदुराव पाटील. केदारनाथ वार्ड क्रमांक- 4- अजित दिनकर जाधव, विजया आनंद कांबळे, मीनाक्षी अमोल शिंदे. पराभूत पॅनेलमधून- सिद्धेश्वर वार्ड क्रमांक- 1- सुहास भीमराव पाटील, संगीता शंकर बडेकर मंदा जगन्नाथ सुतार. अंबाबाई वार्ड क्रमांक- 2 – शहाजी अधिकराव माळी.
विजयी गटाचे बलराज पाटील, राहूल पाटील यांनी नेतृत्व केले. सुपने जिल्हा परिषद गटात पालकमंत्री शंभूराज देसाई व अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीला जिल्हा परिषद गटात चांगले यश मिळाले आहे. पश्चिम सुपने येथेही सरपंच पदासह 2 जागांवर तर डेळेवाडीत 4 जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. सुपने ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोक झिंब्रे यांच्या पत्नी राजश्री झिब्रे यांचा प्रभाग 4 मधून मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.