कराड येथील 100 एसटी कर्मचाऱ्यांना गांधी फाैंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड येथे एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेला आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पगार दिला जात नसल्याने कुटुंबावर वाईट काळ आला आहे. अशा परिस्थितीत कराड येथील गांधी फाैंडेशनच्या वतीने 100 एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाची मागणी का आवश्यक आहे, याबाबतची माहीती कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना सांगितली. यावेळी कार्यक्रमास गांधी फाैंडेशनचे वरधीचंदजी गांधी, धीरजचंदजी गांधी व सुरजचंदजी गांधी उपस्थित होते. आंदोलनात सहभागी कुटुंबियांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आल्याची व्यथा कर्मचारी व कुटुबियांनी मांडली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी व कुटुबियांची उपस्थिती होती.

धीरजचंद गांधी म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना सध्य स्थितीत अर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर बसत असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही मदतीचा हात पुढे केला आहे. गांधी फाैंडेशनकडून आज एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. अजूनही आवश्यक मदत करण्यासाठी आम्ही व आमचे फाैंडेशन तत्पर राहील, असा विश्वास मी कर्मचाऱ्यांना देतो.

Leave a Comment