गोव्यात भाजपला धक्का; निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांच्या अनेक विधानामुळे गोवा राज्यातील राजकारण तापू लागले आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे आणि यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनेही तयारीही केली आहे. मात्र,आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते तथा मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रीपदाच्या राजीनामा दिला असून ते आज संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

गोव्याचत भाजपची सत्ता असल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारकडून यंदा निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र, काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता दिसत आहे. अशात आता भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस असल्यामुळे भाजपचे नेते मायकल लोबो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत त्याबाबत माध्यमांना माहिती दिली. तसेच त्यांनी ट्विट करीत राजीनामा दिल्याचेही सांगितले.

मायकल लोबो यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “खूप विचार करून मी आमदार आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. इथून पुढचा मार्ग हा बर्देझच्या हिताचा आणि आपल्या जनतेच्या पाठिंब्याने विचारपूर्वक निर्णय घेईल.”

मी गोव्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कलंगुट विधानसभा मतदारसंघातील नागरिक आपल्या आपल्या या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे. फक्त मंत्रीपदाचाच नाही तर भाजपच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. पुढचं पाऊल काय असेल? यावर विचार सुरू आहे. मी इतर पक्षांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ज्या दृष्टीकोनातून आमच्याकडे आणि पक्ष कार्यकर्त्यांकडे बघितले गेले. त्यावर आम्ही नाराज आहोत, असेही मायकल लोबो यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हंटले आहे.