पुढील सुनावणी 11 जुलैला; बंडखोर आता करणार काय??

0
121
eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या तील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असतानाच आज दोन्ही बाजूच्या सुनावणी नंतर आता पुढील सुनावणी 11 जुलै होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तोपर्यंत सत्तास्थापनेचा तिढा काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.

आता पुढील सुनावणी ११ जुलै ला होणार असल्याने आता बंडखोर आमदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण आता ११ तारखे पर्यंत त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. १२ जुलै पर्यंत त्याना लेखी उत्तर द्यावं लागणार आहे, तोपर्यंत त्यांना अपात्र करता येणार नाही.

दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी असे आदेश कोर्टाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here