Saturday, June 3, 2023

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे असे म्हणत सुळे यांनी हैदराबाद एन्काउंटर एवजी कायदा महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे. अात्तापर्यंत झाले ते खूप झाले असंही सुळे पुढे म्हणाल्यात. शनिवारी ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हैदराबाद बलात्कार आरोपींच्या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. तर शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी पोलिसांनी हातात कायदा घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.