हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचा अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यात गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांच्या हातूनच राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव गेले आहे. निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी ही उपमुख्यमंत्री अजित पवारांचीच (Ajit Pawar) असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांचा गट संघटन बांधणीसाठी जोमाने कामाला लागला आहे. मुख्य म्हणजे, अशातच आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवारांनी पहिली निवडणूक जिंकलेली तेव्हाचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला एक कॅप्शन देखील दिले आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव दोन्ही अजय पवार गटाला मिळाल्यामुळे याचा मोठा धक्का शरद पवार गटाला बसला आहे. यावरून विरोधक शरद पवार गटावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपले ताकद दाखवत संघटन बांधणीसाठी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वेगवेगळ्या सभा बैठका देखील पार पडत आहेत. कशातच सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी ज्यावेळी पहिली निवडणूक जिंकली होती तेव्हाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, ”शरद पवारांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज 56 वर्षे पुर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खुप मोलाचं आहे”
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा पहिली निवडणूक जिंकल्याचा फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावरील या फोटोविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. खास म्हणजे या फोटोमध्ये शरद पवार चक्क सायकल चालवताना दिसत आहे. तर, विजयी झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खुललेले देखील फोटोमध्ये दिसत आहे. दरम्यान, सर्वात प्रथम 1967 साली शरद पवार विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हापासून ते आजवर शरद पवार कायम राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत. आता हातातून पक्ष गेल्यानंतर देखील शरद पवार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलेले देखील दिसत आहेत.