योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं ते पाहता उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

“देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत,” अशी टीका त्यांनी केली आहे. “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारने स्वत:ची चूक कबूल करावी,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली. “उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” असंही त्या म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like