Saturday, June 3, 2023

शरद पवारांचे नातवाला ड्राईव्हिंगचे धडे; सुप्रिया सुळे म्हणाल्या स्पिड लिमिट माहितेय ना?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक आनंदात इतरांना सहभागी करुन घेताना दिसतात. कधी रोहित पवार असतील किंवा कधी पार्थ पवार असतील. यावेळी मात्र सुळे यांनी आपला मुलगा विजय सुळे यांचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. (Sharad Pawar gives Driving lessons to Supriya Sule’s son Vijay Sule) खुद्द शरद पवार या व्हिडिओत आपल्या नातवाला ड्राईव्हिंगचे धडे देताना दिसत आहेत.

विजय सुळे यांनी आई सुप्रिया सुळे आणि आजोबा शरद पवार यांना पहिल्यांदा ड्राईव्हवर नेले. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून नातवाच्या ड्राईव्हिंगचा आनंद घेत आहेत, तर मध्येच नातवाला ते ड्राईव्हिंगचे धडे देत आलंयाचं व्हिडिओत दिसतेय. सुप्रिया सुळे यांनी मागे बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला.

‘आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो, आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘हळूहळू, हॉर्न उगाच वाजवू नका स्पीड लिमिट काय माहित आहे न?’ अशा काही सूचनाही सुप्रिया सुळे लेकाला करताना ऐकू येतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या ड्राईव्हिंगचे धडे देताना आजोबा सख्ख्या नातवालाही ‘राजकीय स्टिअरिंग’ हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा रंगली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’