बीड | सरकारच्या शेती धोरणाने कांदा उत्पादक शेतकर्याला रडवल आहे. कांद्याचा फक्त वाहतुक खर्चही निघत नाही इतके कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचा निषेध म्हणुन सुराज्य सेना, सीपीआय, आणि समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदा वाटप हे आगळं वेगळं आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी 93 रूपयाची आर्थिक मदत केली जी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.
यावेळी सुराज्य सेने चे मराठवाडा अध्यक्ष वचिष्ट बडे, समाज माध्यम प्रमुख प्रितेश दायमा, SFI चे मोहन जाधव, संगमेश्वर आंधळकर,पंचायत समिती सदस्या पूजा मोरे, माजी सैनिक अशोक येडे, कमलाकर लांडे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, सुराज्य विद्यार्थी सेनेचे विनोद कुठे, ऋषभ कोठारी, राज बडे, सय्यद सादेक, दत्ता प्रभाळे, अमरजान पठाण इ. उपस्थित होते.