‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । ”शरद पवारांच्या घरात काही तरी चालू आहे. प्रत्येक घरात रुसवे फुगवे चालतच असतात. मात्र आमच्या घरात सगळं आलबेल आहे. आमच्या घरात काही चालू नाही हे सांगायची पाळी पवार यांच्यावर का येते?’ असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री सुरेश धस यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले.

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

दरम्यान ”राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील अनेक बिघडलेले पुतणे त्यांच्या घरात घेतले. त्यामुळे त्यांच्या घरात तशी सवय लागली असेल. एखादा कांद्याला काही झालं तर त्याला बाजूला काढून ठेवतात. नाहीतर सगळे कांदे तो खराब करतो. तसेच ‘हे’ पुतणे राष्ट्रवादीत गेल्यामुळेच पवार घराण्याचे तसे झाले असेल!” असा टोला माजीमंत्री आ.सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचे नाव न घेता लगावला आहे. यावेळी त्यांनी बोलताना ‘राष्ट्रवादी’चे संदीप क्षिरसागर यांच्यावर देखील टिका केली आहे.

इतर काही बातम्या-