बीड | जिल्ह्यातील विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आठ महिन्यांपूर्वी आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या घराची भिंत पाडल्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 जणांवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांकडून कसलीच कारवाई झाली नसल्याने तक्रारदार माधुरी चौधरी यांनी उच्च न्यायालया धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शांतता भंग करणे, भीती दाखविणे आणि दरोड्याचे कलम वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र राजकीय सूडापोटी हे सत्र सुरू असून आम्हीदेखील न्यायालयात दाद मागणार असल्याचं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे.
साधारण आठ महिन्यांपूर्वी बीडमधील आष्टी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनल विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीतील राजकारणाचा राग मनात धरत सुरेश धस आणि त्यांचे समर्थकांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार माधुरी चौधरी यंनी केली होती. तसेच 19 जुलै रोजी रात्री सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी पांढरी येथील चौधरी यंच्या घराची तसेच हॉटेलची जेसीबीने तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीनुसार, पूर्वी पोलिसंनी भारतीय दंड विधानाच्या कलम 143, 147, 148, 149, 427, 336 आणि 379 ही कलमे लावली होती. मात्र पोलिसंकडून काहीच कारवाई झाली नाही.
त्यामुळे माधुरी चौधरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यनंतर आमदार सुरेश धस यांच्याविरोधातील कलमात वाढ करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, आमदार धस आणि साथीदारांवरील गुन्ह्यांत वाढ झाली आाहे. आता नव्याने दरोडा 395 , बेकायदा घरात घुसणे 448 , चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे452 , यासह शांतता भंग करणे आणि इतर 341 ,504 ,506 ही कलमे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. दरम्यान ही घटना घडलीच नसून राजकीय सूडापोटी हे षडयंत्र रचले जात असल्याचा प्रतिआरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. आम्हीही न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती धस यांनी दिलीय.