सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज ते मालगाव रस्ताकामासाठी ५ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आता तो रस्ता रूंदीकरण करूनच केला जाणार आहे. परंतु स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे व तानाजी हे सुरेश खाडे यांच्यावर टीका करीत आहेत. सुरेश खाडे यांच्यावर टीका करण्याचे उद्योग बंद करावे, अन्यथा जशास तसे उत्तर देवू. आटमवणे यांनी स्वत:च्या मतदार संघात किती कामे केली आहेत ते पहावे. अशी टिका मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत, पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी केली.
यावेळी बोलताना प्रदीप सावंत व किरण बंडगर म्हणाले, मिरज ते मालगाव रस्त्यासाठी ५ कोटी ५० लाखांचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामस्थांच्या व वाहनधारकांतून हा रस्ता रूंद करून मगच डांबरीकरण करावे अशी मागणी आ. सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम बंद होते. आ.सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज ते मालगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाची मंजुरी मिळाली आहे. सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज ते मालगाव रस्ता मंजूर झाला असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार आहे. परंतु केवळ स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंचायत समिती सदस्य अनिल आटवणे व तानाजी पाटील हे सुरेशभाऊ खाडे यांच्यावर टीका करीत असल्याचा टोला त्यांनी यावेली लगावला.