सुशांतसिंग प्रकरणी सुरेश रैनाने केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयात झाला. त्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारवर विरोधकांनी टीकाही केली आहे.  सुशांतच्या निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.आता तर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले आहे.

सुशांतसिंगच्या तपासाबाबत रैनाने एक ट्विट केले आहे. त्याबद्दल रैनाने म्हटले आहे की, ” तुझ्या निधनाने मला बऱ्याच वेदना झाल्य आहेत, हे दु:ख विसरता येऊ शकत नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की, तुझ्या प्रकरणात सत्याचाच विजय होईल.”

कालचं सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’