कुख्यात गुंड ‘टिप्याने’ केले आत्मसमर्पण

0
177
tipya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पोलिस अधिकाऱ्याचा अंगावर जीप घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा, कारागृह पोलिसाला धमकावून खंडणी उकळणारा कुख्यात गुन्हेगार टीप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर झाला. त्याने नाट्यमयरीतीने केलेल्या शरणागती मागे पोलिसांकडून ‘टिपले’ जाण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे.

दोन पोलिसांना खेळणाऱ्या टीप्याला तातडीने बेड्या घाला असा आदेश पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेत पुंडलिकनगर पोलिसांना दिला. गुन्हे शाखेचे सह आण्यांची पथके त्याचा शोध घेत होती. मालेगावातील कुख्यात गुंड मेहताच्या फार्महाऊसवर ही पोलिसांनी धाड टाकली होती. मात्र, तेथेही तो सापडला नव्हता. शहरात त्याची बहीण आईच्या हालचालीवर ही पोलिसांची नजर होती.

दहा दिवसांनंतरही पोलिस त्याला पकडू शकले नव्हते. मात्र, मंगळवारी दुपारी बारा वाजेदरम्यान तो आईसह नाट्यमयरीत्या न्यायालयासमोर हजर झाला. पोलीस माझा एन्काऊंटर करतील अशी भीती त्याने व्यक्त केल्याने न्यायालयाने त्याची रवानगी 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत हर्सुलला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here