मुंबई । महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांना विचारला आहे. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
दवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी असून मित्रपक्ष जेडीयूकडून बिहारचे माजी पोलीस प्रमुख गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढवत आहेत. यावरून फडणवीस यांना लक्ष करत अनिल देशमुख यावेळी म्हणाले कि, ”गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला जाणार का?, बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?,” असं म्हणत गृहमंत्र्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.
सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपाने केले. ज्यांनी 5 वर्षे राज्याचं नेतृत्व केलं ते फडणवीस मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं म्हणाले होते. त्यामुळे माझे त्यांना दोनच प्रश्न आहेत. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असंही म्हणत अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे.
AIMS आणि मुंबई स्थानिक रुग्णालयाचे रिपोर्ट बघितले तर त्यामध्ये वेगळं काही आढळलं नाही. CBI तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला, तर सुशांत सिंह प्रकरणामधील तथ्य बाहेर येईल, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. मिशिगन विद्यापीठ, अमेरिका यांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, त्यात सुशांत सिंह प्रकरण हे उचलून धरलं असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे यांनी हे प्रकरण ताणून धरलेलं आहे. यानिमिताने महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपने केलं आहे. मुंबई पोलिसांनीसुद्धा तपास योग्य दिशेनं केल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”