बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप! सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीला नेटकऱ्यांनी चांगलचं धारेवर धरलं. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाली असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपासणी सीबीआय करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सुशांत संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिप यानं सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या वेळी सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचा खुलासा सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने केला आहे. तसेच बॉलिवूडमधील माफियांच्या दाबावामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

सॅम्युअलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘मला आजही आठवते केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते. ते एकमेकांचा आदरही करायचे आणि हा आदर फार कमी रिलेशनशीपमध्ये पाहायला मिळतो’ असे म्हटले आहे.सारा सुशांतसोबतच त्याच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा तसेच त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायची. मात्र सुशांतचा सोनचिडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अचानक साराने ब्रेकअप केला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण मला आजही समजले नाही. त्यांचा ब्रेकअप बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे झाला असावा या आशयाची पोस्ट सॅम्युअलने केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”