शिंदेंचे 20 आमदार फोडून फडणवीस मुख्यमंत्री होणार? कोणी केला दावा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात भाजपचं ट्रॅप टाकत आहे. त्यांच्या सोबतच्या ४० आमदारांपैकी २० आमदार कधी भाजपमध्ये जातील आणि फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील हे शिंदेंना सुद्धा कळणार नाही असा मोठा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे . पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी हे विधान केलं आहे.

भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. उद्या शिंदेंच्या गटातील ४० पैकी २० आमदार देवेंद्र फडणवीसांनी भाजपात घेतले तर नवल वाटायचं कारण नाही कारण येणाऱ्या काळात पंतप्रधान पदासाठी मोदींना सुद्धा आव्हान देणार कोणतं नाव असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे असं सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) म्हंटल .

दरम्यान, एका जुन्या व्हिडीओवरून वारकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ” “सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती भाजपाने माझ्याविरोधात जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असं काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे किर्तनकार नाहीत, ते पेड किर्तनकार आहेत असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.