व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बायकोवर चारित्र्याचा संशय : बापाने अडीच वर्षाच्या मुलाला फरशीवर आपटून ठार केले

सांगली | बायकाेवरील राग बापाने मुलावर काढला, अडीच वर्षाच्या मुलाला फरशीवर आपटून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. कराड तालुक्याच्या शेजारी असलेल्या आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात बापावर गुन्हा नोंद झाला आहे. बायकोवर चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात मुलाचा जीव गेला आहे. शिवाजीनगर (ता. कडेगाव) येथील घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आयुष अर्जुन सावंत असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत असे बापाचे नाव आहे. याबाबत मुलाची आई पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अर्जुन सावंत याचा शिवाजीनगर येथील पिंकी सावंत हिच्याशी विवाह झाला होता. सध्या अर्जुन हा शिवाजीनगर येथे राहत होता. अर्जुन याला दारूचे व्यसन असून तो वारंवार आपली पत्नी पिंकी हिच्याशी चरित्र्याचा संशय घेऊन वारंवार भांडत असे. सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन व त्यांची मुले घरी होते. अर्जुनला घरी पाहताच पिंकीने कामावर का गेला नाहीस असे विचारले. त्यांनतर काही वेळाने पती अर्जुन हा दारू पिऊन ताे घरी परतला.

त्यानंतर पिंकी सोबत भांडायला लागला. तू चांगली नाहीस असे म्हणत, त्याने पिंकीला शिवीगाळ केली. तसेच पिंकी जवळ असलेल्या आयुषला हिसकावून त्याने आपल्या जवळ घेतले. त्याने आपल्याच मुलाला फरशीवर आपटले. यामुळे चिमुकला आयुष्य रक्तबंबाळ झाला. त्याला कुटुंबियांनी तातडीने सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान उपचार सुरु असताना आयुषचा मृत्यू झाला.