सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा; सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीत खासदार सुनील तटकरे यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली आहे. परिशिष्ट दहानुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी, कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब नमूद केली आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर ओम बिर्ला काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे सुनील तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही करावी केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या” तर यावेळी चार महिने उलटूनही तटकरे यांच्यावर कोणतेही कारवाई न करण्यात आल्याची खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

सध्या पक्षफुटीनंतर सुनील तटकरे अजित पवार गटात गेले आहेत. याकाळात त्यांनी, पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करण्यात यावे अशी याचिका सुप्रिया सुळे यांनी केली होती. परंतु या याचिकेवर कोणताही विचार न झाल्यामुळे सुप्रिया सुळे या थेट लोकसभा अध्यक्षांकडे गेले आहेत. त्यांनी, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे आता सुनील तटकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.