मनपाच्या विनंती नंतर व्यापाऱ्यांचा बंद स्थगित; हातगाडीवाले मात्र बंदवर ठाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील पैठण गेट व्यापारी असोसिएशन तर्फे दुकानात समोरील हातगाडी चालकांना हटवण्याच्या मागणीसाठी 22 तारखेला पुकारण्यात आले. बेमुदत बंद आंदोलन मनपाच्या विनंतीनंतर व्यापाऱ्यांनी स्थगित केले आहे. दुसरीकडे मात्र हात गाडी चालक व्यापार यांच्याविरोधातील बंद वर ठाम आहेत. बंद शिवाय मोर्चा ही काढण्याचा निर्धार आयटक आणि नॅशनल ऑफर्स फेडरेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

पैठण गेट, टिळकपथ व्यापारी असोसिएशन तर्फे 22 नोव्हेंबर पासून बेमुदत व्यापार बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. यासंदर्भात मनपाला आंदोलनाचे निवेदनही देण्यात आले होते. मनपा प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते.

व्यापारी असोसिएशनने मनपाकडे पाच मागण्या केल्या होत्या. त्यापैकी नो हॉकर्स झोन अंतर्गत एकही हात गाडी रस्त्यावर उभी राहणार नाही. तसेच पार्किंग झोन उभारणी या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपाने व्यापारी असोसिएशनकडे चार महिन्यांची मुदत मागितली असून प्रशासनाने तसे लेखी स्वरूपात असोसिएशनच्या अध्यक्षांकडे लिहून दिले आहे. त्यामुळे बेमुदत व्यापार बंद आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप चोटलानी, युसुफ मुकाती, भरत शहा, हिरा परसवानी आदींनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment