राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण! बंदुक असती तर ठार केले असते अशी धमकी दिल्याने खळबळ

परभणी प्रतिनिधी : गजानन घुंबरे

राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य, बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी पाथरीमध्ये घडली असून अंत्यविधीसाठी कबरस्तान मध्ये गेल्यावर हा प्रकार घडला आहे.

आ . बाबाजानी दुर्राणी हे आज पाथरी येथील कब्रस्तान मध्ये एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी मोहम्मद बिन सईद या इसमाने, सरळ येऊन बाबाजानी यांना थापड आणि चापटांनी मारहाण करायला सुरुवात केली. सोबतच आपल्याकडे बंदुक असती तर, या बंदुकीने तुला ठार केले असते. अशी धमकीही आमदार बाबाजानी दुर्रानी यांना दिली. घडलेल्या प्रकारानंतर, आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत, हे भांडण मिटवले. परंतु त्यानंतर गाव आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून, पोलिस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला आहे. तर पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आले असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर, पाथरी शहरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले असून, संबंधित आरोपीवर तडीपारीची कारवाई करावी. अन्यथा 22 तारखेपासून, बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.