SUV Cars : भारतीय बाजारपेठेत लवकरच होणार ‘या’ गाड्यांची धमाकेदार एंट्री

SUV Cars
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SUV Cars : कोरोना काळामध्ये बंद पडलेली ऑटो इंडस्ट्री आता नव्याने भरारी घेते आहे. कोरोना साथीच्या काळानंतर आता नवीन कारची खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. सध्याच्या काळात भारतीय बाजारपेठेमध्ये 7 सीटर कारच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होते आहे. ज्यामुळे कार बनवणाऱ्या कंपन्यांकडूनही सातत्याने 7 सीटर मॉडेल लाँच केले जात आहेत. आजच्या बातमीमध्ये आपण भारतीय बाजारापेठेत लॉन्च होणाऱ्या अशाच काही गाड्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Mahindra Bolero Neo [2021-2022] N10 Price in India - Features, Specs and Reviews - CarWale

महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा बोलेरो निओ सध्याच्या देशातील सर्वात सक्षम VFM SUV पैकी एक आहे. आता कंपनीकडून लवकरच नवीन बोलेरो निओ प्लस लाँच केली जाणार आहे. 2022 च्या अखेरीस त्याची विक्री सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. या नवीन 7-सीटर SUV मध्ये थार-सोर्स 2.2L mHawk डिझेल इंजिन आणि दोन सीटिंग कॉन्फिगरेशन देण्यात येईल. मात्र याच्या एक्सटीरियर स्टाइलिंगमध्ये कोणतेही मोठे बदल केले जाणार नाहीत. SUV Cars

2021 Force Gurkha launched; Priced at Rs 13.59 lakh | CarTrade

फोर्स गुरखा

सध्या देशातील सर्वात सक्षम 4X4 SUV मध्ये फोर्स गुरखाची गणना केली जाते आहे. भारतात लवकरच हा ब्रँड आपले 5-डोअर असलेले व्हेरिएन्ट लॉन्च करेल. ही गाडी चार-आसनाच्या लेआउटसह ऑफर केली जाणार आहे. ही नवीन फोर्स गुरखा आणि सध्याच्या 3-डोअर व्हर्जनपेक्षा खूप मोठी असेल. तसेच यामध्ये मर्सिडीज-बेंझचे 2.6L डिझेल इंजिन देण्यात आले आहे. SUV Cars

2019 MG Hector review, road test - Introduction | Autocar India

एमजी हेक्टर प्लस

टाटा हॅरियर, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, जीप कंपास आणि बाजारपेठेतील इतर प्रीमियम मध्यम आकाराच्या SUV ना टक्कर देण्यासाठी MG कडून हेक्टर SUV लाँच करण्यात आली. आता नवीन अपडेटेड डिझाइन, नवीन फीचर्स, रिफ्रेश्ड केबिन आणि सुधारित सेफ्टी फीचर्ससहीत हा ब्रँड लवकरच देशात नवीन हेक्टर फेसलिफ्ट लॉन्च करेल. SUV Cars

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.googleadservices.com/pagead/aclk?sa=L&ai=DChcSEwif1fL7zL_7AhUDdmAKHcVrCqcYABAAGgJ0bQ&ohost=www.google.com&cid=CAESbeD2er9GurQjf3CXPYUHbFmln05Ds2xKI9Sre_P1kdYSnqFrPVGGh-dBb9aSIEv_15U8mAcBUDPWsI628JluCmlNu-HdJI9GUg0K4AJH6XFAyAoGBzHk9cSXYJBrWPLgEEGvhv7drGrMQRa_6LM&sig=AOD64_12NmzY24zWc-wsGlj71Wtkg2OHpg&q&adurl&ved=2ahUKEwi10On7zL_7AhU6pVYBHeO5AL4Q0Qx6BAgKEAM

हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा
फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या
आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 159 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा