किसनवीर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

किसनवीर साखर कारखान्यांची चार वर्षाची एफआरपीची अडकलेली आहेत. तेव्हा किसनवीर साखर कारखान्यांवर प्रशासक नेमावा. शेतकऱ्यांना खोटी लाईट बिले दिली जातून ती भरण्यासाठी धमकावत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत, अशावर फाैजदारी कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी इशारा दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यात करिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील ऊस बिल अद्याप दिले नाही ते तातडीने व्याजाचा मिळावे व ते बेकायदेशीर अडवून ठेवले म्हणून सदर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावीआदी मागण्यांसह हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अॅड. सतीश कदम, रवींद्र घाडगे, मनोहर विजय चव्हाण, अर्जुन भाऊ साळुंखे, अनिल पवार, धनंजय महामुलकर, देवानंद पाटील, श्रीकांत लावणी, तानाजी देशमुख, दादासाहेब यादव आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते